आठ महिन्याच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर, X-ray पाहून पालक हादरले आणि…

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अवघ्या आठ महिन्याच्या चिमुरड्याने नेलकटर गिळल्याने या बाळाच्या आई-वडिलांच्या पाया खालची जमीनच हादरली आहे. लहान मुले, रांगणारी मुले कधी काय करतील याचा काही नेम नाही. त्यांच्याकडे थोडंसे जरी दुर्लक्ष झाले तरी ते किती महागात पडू शकते. याचा प्रत्यय देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

(हेही वाचा – नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात; महानगरप्रमुख पदी नियुक्ती)

मिळालेल्या माहितीनुसार, एका ८ महिन्यांच्या चिमुरड्याने त्याच्या हाताला एक वस्तू लागली आणि सवयीने त्याने ती तोंडात घातली. कोणाला काही कळण्याच्या आत त्याने ती वस्तू गिळली. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा तब्येत बिघडली यानंतर त्या चिमुरड्यास डॉक्टरकडे नेण्यात आले. तेव्हा या चिमुरड्याचा एक्सरे काढण्यात आला. हा एक्सरे पाहून त्या चिमुकल्याच्या पालकांची पाया खालची जमीनच हादरली. आठ महिन्याच्या चिमुरड्याने नेलकटर गिळल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यावेळी नेलकटर बाहेर काढण्यात आले. सध्या या चिमुरड्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

काय घडला प्रकार

सोमवारी नाशिक रोडच्या के.जी मेहता या परिसरात ही घटना घडली. शिंदे कुटुंबियातील ८ महिन्याचा मुलगा आशिष शिंदे हा घरात खेळत होता. १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याने नेलकटर गिळले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. या प्रकारानंतर ८ महिन्याच्या चिमुरड्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याच्या पालकांनी नाशिकच्या आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी धाव घेतली. यावेळी त्याचा एक्सरे काढण्यात आला. हा एक्सरे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. एक्सरेच्या रिपोर्टमध्ये या चिमुकल्याने नेलकटर गिळल्याचे समोर आले. यानंतर डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत अलगद नेलकटर बाहेर काढले आहे. सध्या मुलाची प्रकृती ठीक असून त्याला कोणतीही ईजा झाली नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here