स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४१वी जयंती मंगळवारी, (२८ मे) सर्वत्र साजरी करण्यात आली. नाशिक शहर पोलीस ठाण्यातही वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यासंदर्भातील माहिती नाशिक शहर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर ‘X’द्वारेही शेअर केली आहे. (Nashik Police)
नाशिक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूर येथील वीर सावरकर यांच्या वाड्यात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. वीर सावरकर यांच्या पुरातन वाड्याची माहिती घेतली तसेच वाड्यात असलेल्या अष्टभुजा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन देवीला प्रार्थना केली. (Nashik Police)
‘देवीच्या चरणी हात ठेऊन अशी प्रतिज्ञा करतो की, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन.’
स्वा. सावरकरांनी याच ठिकाणी अष्टभुजा देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा… pic.twitter.com/5SLgotL8La
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) May 28, 2024
(हेही वाचा –Delhi Weather: राजधानी दिल्ली उष्णतेने होरपळली! ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद )
अष्टभुजा देवीच्या चरणी प्रार्थना करताना ते म्हणाले की, ‘माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीता मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन.’
नाशिक शहराचे सी. पी. संदीप कर्णिक यांनी ‘X’वर लिहिले आहे की, महान स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली. ते आपल्याला अनंत काळासाठी प्रेरणा देत राहतील. शतश: नमन!!!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community