नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या खरशेतच्या सावरपाडामधील आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत आता संपल्याचे समोर आले आहे. खरशेत येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी 30 फूट खोल नदीवरुन जीवघेणी कसरत करावी लागत होती. याबाबतच वृत्त माध्यमांनी दाखवल्यानंतर या ठिकाणी दोन दिवसांत या नदीवर लोखंडी पूल बसवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी महिलांना दिलासा मिळाला असून त्यांची पाठ्यासाठीची जीवघेणी वाट सुसह्य झाली आहे. आता या पुलामुळे पिढ्या न् पिढ्या होणारी जीवघेणी कसरत आता दूर झाल्याने या आदीवासी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीही नदी पार करण्यासाठी पूल नव्हता. पिढ्यान पिढ्या जीवघेणी कसरत सुरू होती ती समस्या आज दूर झाली आहे.
भीषण वास्तवाची शिवसेनेेनं घेतली दखल
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या खरशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सावरपाडा मधील आदिवासी महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास अंगावर शहारे आणणारा होता. हे भीषण वास्तव माध्यमांनी समस्त महाराष्ट्रासमोर मांडल्याने याची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यांनी सावरपाडामध्ये जाऊन उपाययोजना करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या. त्यानंतर नाशिक आणि मुंबईच्या शिवसैनिकांकडून आदेशाची अंमलबजावणी करत अवघ्या दोन दिवसात तास नदीवर 30 बाय 4 फुटांचा लोखंडी पूल बसविण्याचे काम सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भातील ट्विटदेखील आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
(हेही वाचा –तिसरी लाट लवकर आली आणि आता औषध साठ्याची बोंबाबोंब झाली…)
पाण्यासाठी आदिवासी महिलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो ही बातमी वाचून अस्वस्थ झालो. येथील स्थानिकांशी बोलून महिलांच्या सोयीसाठी येथे ताबडतोब लोखंडी साकव बांधण्याचे काम सुरू झाले आहे. २ दिवसात हे काम पूर्ण करून आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू. pic.twitter.com/q1jbYACCfz
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2022
घराघरात पाईपलाईननं पाणी देण्याचं आश्वासन
खरशेतच्या आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी जीवघेणी कसरत संपणार, अशी बातमी माध्यमांनी दाखवल्यानंतर या बातमीची शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी देखील दखल घेतली आहे. खरशेतमधील घराघरात पाईपलाईननं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत गोडसे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. इतकेच नाही तर याचीच दखल घेत घराघरात पाईपलाईनने पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community