MSRTC बसचे ब्रेक फेल झाल्यानं ‘एसटी’ची ३-४ बाईकला धडक, ६ जण ठार अन्…

148

नाशिक सिन्नर महामार्गावर एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना (बाईक) धडक दिली. हा अपघात गुरूवारी दुपारी झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. एसटी बसचे (MSRTC) ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर लगेच एसटी बसने पेट घेतला.

नाशिक सिन्नर महामार्गावर शिंदे पळसे गावाजवळ हा अपघात झाला. एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकी स्वारांना धडक दिली आणि चिरडले. हा अपघात झाल्यानंतर लगेच एसटी बसने पेट घेतला. बस पेटल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर प्राथमिक अंदाजानुसार, एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.

(हेही वाचा – मुंबईत बनावट आधार, पॅन कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! एकाला बेड्या)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवांनांनी घटनास्थळी दाखल झाले होत बचावकार्य सुरू केले. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून पेट घेतलेल्या एसटी बसची आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. या अपघातात १० ते १२ जण जखणी झाले आहेत. जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.