त्र्यंबकेश्वरमधील खरशेत येथे बारा पाडे आहेत. त्या बारा पाड्यांमधील अनेक कुटुंबांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर टाकण्यात आलेल्या लाकडी फळीवरुन चालत जावे लागते. डोंबा-यांपेक्षाही भयंकर कसरत या पाड्यातील महिलांना दररोज करावी लागत आहे.
रोजचा जगण्या-मरण्याचा संघर्ष
सरकारी अनेक योजना गावात येतात, परंतु वस्तीपर्यंत पोहचत नाहीत, ही येथील आदिवासींची व्यथा आहे. वस्तीपासून नदी जवळ आहे, पण पाणी शुद्ध नसल्याने झऱ्यांमधून महिलांना पाणी आणावे लागते. झरे नदीच्या पलीकडे असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे. दररोज जगणे-मरण्याचा संघर्ष महिलांचा पाण्याच्या निमित्ताने ठरलेला आहे. लाकडी फळीवरुन पाय सरकल्यास थेट खोल नदीत पडण्याची शक्यता असते. अनेक ग्रामस्थ या नदीत कोसळले आहेत.
( हेही वाचा: कुर्ल्याचे दोन तुकडे!)
तात्काळ पूल बनवण्याची मागणी
परिसरातील इतर नद्यांवर पूल बांधले गेले आहेत. मात्र या नदीवर पूल न झाल्याने दुष्काळातील तेरावा महिना दूर व्हायला तयार नाही. सरकारी अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत, अधिकारी यंत्रणांना लोखंडी पूल तयार करण्यास सांगितले, तसेच स्थानिक शेतकरी तुकाराम बुधा गांगोडे यांनी स्वतःचा गट क्रं. 242 मध्ये विहिरीला जागा देण्यास सहमती दिली आहे.
Join Our WhatsApp Community