‘या’ 10 ठरावांनी वाजले 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप

142

वर्ध्यातील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 10 ठराव मांडण्यात आले आहेत.

  • राज्यातील ग्रंथालयीन कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीत एकसूत्रीकरण असावे, त्यांना किमान वेतन कायदा सक्तीचा करावा, अशी मागणी हे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठरावाद्वारे करत आहे.
  • पुस्तकांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी प्रकाशकांना छपाई आणि कागद खर्चात सबसिडी देण्यात यावी, तसेच त्यांना जीएसटीमधून वगळण्यात यावे, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील या ठरावाद्वारे करण्यात आली.
  • कोणत्याही कारणास्तव राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित मराठी आणि सेमी इंग्रजी शाळांचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये रुपांतर केले जाणार नाही, यासाठी विधीमंडळात कायदा करण्यात यावा.
  • महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषा अस्तंगत होत आहेत. बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाने बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी.

( हेही वाचा: राष्ट्रीय उद्यानातील सिंह दर्शनाला जाळ्यांच्या चुकीच्या डिझाईनचा अडथळा )

  • राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्ट क्रमांक 13 नुसार महाराष्ट्रबाहेरील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या समाविष्ट व संलग्न संस्थांना 5 लाथ अनुदान प्रतिवर्षी वित्तीय वर्षाच्या सुरुवातीला देण्यात यावे.
  • बृहन्महाराष्ट्रीतील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा हैदराबादमधईल मराठी साहित्य परिषदेतर्फे चालवण्यात येणारे मराठी महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. या शिक्षण संस्थांना शासनाने त्वरित अनुदान देऊन त्या चालू ठेवण्यास सहकार्य करावे.
  • म्हादई नदी प्रामुख्याने गोव्यातून वाहते. ती कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी वळवण्याचा प्रयत्न होतो आहे. सदर नदी वळवल्यास पाण्याची तीव्र टंचाई होईल. म्हणून ही नदी न वळवण्याचा विचार व्हावा, अशी विनंती केंद्र सरकारला करावी.
  • पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कारासाठी मराठी ग्रंथांची निवड करताना, ते ग्रंथ व्यवस्थित वाचूनच निर्णय घ्यावा आणि पुरस्कार जाहीर केल्यानंतर शासनाने तो परत घेऊ नये, आदी 10 ठराव घेऊन त्याला अनुमोदन देत साहित्य संमेलनाचे सूप वाजले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.