शिक्षक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रपतींच्या हस्ते देशाचील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
( हेही वाचा : सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक; राज्यात नोव्हेंबर महिन्यात विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता)
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबरला जन्मदिवस असल्यामुळे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशी दोन्ही पदे त्यांनी भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली म्हणून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामुनाईकतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community