थलैवा रजनीकांत यांच्या रोबोट सीरीजमधल्या २.० चित्रपटात पक्षीराजन हा खलनायक होता. मोबाईल टॉवर्समुळे पक्ष्यांच्या आयुष्याला धोका निर्माण होतो. पक्ष्यांना वाचवता वाचवता हा वैज्ञानिक परण मावतो. मात्र त्याचा ऑरा मानवतेच्या विरोधात लढायला सज्ज होतो, पक्षांसाठी. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लावलं होतं, तेव्हा किती चिमण्या अचानक दिसू लागल्या होत्या. पण आता त्या पुन्हा नाहिशा झाल्यात. कारण प्रदुषण…
वाचकहो, राष्ट्रीय पक्षी दिवस (National Bird Day) दरवर्षी ५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी, पक्षी रक्षक आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे लोक राष्ट्रीय पक्षी दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. बॉर्न फ्री यूएसए आणि एव्हियन वेल्फेअर कोलिशनने २००२ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा Cow Slaughtering : धर्मांध मुसलमानांची विकृती; गाभण गायीची केली हत्या; परिसरात संतापाची लाट)
राष्ट्रीय पक्षी दिन (National Bird Day) हा पक्ष्यांवर प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. कारण पक्षी हे पर्यावरणाचा घटक आहेत. त्यांच्यामुळे आपलं जीवन सुसह्य होतं. पूर्वीपेक्षा आज पक्ष्यांची कमतरता भासत आहे. शहरी भागात तर पक्षी नाहीतच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवाला वाटले की तो या जगाचा अधिपती आहे. मात्र या इतर प्राणी व पक्ष्यांमुळे त्याला जीवन जगायला सहायता मिळत असते. त्यामुळे हे जीव जगले पाहिजेत, त्यांना जगवले पाहिजे.
बॉर्न फ्री यूएसएच्या मते, जगातील अंदाजे १०,००० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी १२% प्रजाती नष्ट होऊ शकतात, तसा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा दिवस साजरा करुन पक्ष्यांना जगवले पाहिजे, त्यांचे संवर्धन केले पाहिजे ही भावना रुजवली जाते. तर चला, आपणही आपल्या अवती भोवती असलेल्या पक्ष्यांचे संवर्धन करुया. त्यांना दाणे आणि पाणी तरी आपण देऊ शकतो ना?
Join Our WhatsApp Community