नॅशनल सिनेमा डे निमित्त १६ सप्टेंबर रोजी अवघ्या ७५ रूपयांत सिनेमा पाहण्याची ऑफर सिनेमा प्रेमींना देण्यात आली होती. मात्र या सिनेमा प्रेमींना थोडा धीर धरावा लागणार आहे. कारण रणबीर-आलियाच्या ब्रम्हास्त्र या सिनेमामुळे स्वस्तात पिक्चर बघण्यासाठी अजून वाट पहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. बॉक्स ऑफिसवर ब्रम्हास्त्र हा चित्रपट चांगली कामगिरी करत असल्याने हा निर्णय आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
(हेही वाचा – Gaganyaan Spaceflight Mission: मानवाला अंतराळात पाठवण्याचे भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार)
म्हणून घेतला निर्णय
असे सांगितले जात आहे की, १६ सप्टेंबर रोजी नॅशनल सिनेमा डे निमित्त अवघ्या ७५ रूपयांत मल्टिप्लेक्स सिनेमागृहात सिनेमा पाहण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र ब्रम्हास्त्रच्या कलेक्शनवर या ऑफरचा परिणाम होऊ नये, यासाठी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने नॅशनल सिनेमा डे १६ ऐवजी २३ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हास्त्रच्या टीमने विनंती केल्यानंतर मल्टिप्लेक्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
७५ रुपयांच्या तिकीटात बघा चित्रपट
नॅशनल सिनेमा डे असल्यामुळे देशात पीवीआर, आईनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए २, मूवीटाइम, वेव, एम२के आणि डेलाइटसारख्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे ४ हजार स्क्रिन्स आहेत, या सर्व सिनेमागृहांची तिकीटे ७५ रुपयांनी विकली जाणार आहेत. ही ७५ रुपयांची तिकीट ऑफर IMAX, 4DX आणि त्या आठवड्यात थिएटरमध्ये येणाऱ्या सर्व सिनेमा आणि चित्रपटांवर लागू होणार असून या ऑफरमध्ये लक्झरी व्हेरिएंट समाविष्ट नसले तरी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community