National Consumer Rights Day : राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिनाची वैशिष्ट्ये!

43
National Consumer Rights Day : राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिनाची वैशिष्ट्ये!

“राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिन” दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायदा विधेयक २४ डिसेंबर १९८६ रोजी मंजूर करण्यात आले होते. यानंतर १९९१ आणि १९९३ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहक हक्कांमध्ये संरचनात्मक बदल घडवून आणला. पूर्वी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशिष्ट कायद्यांचा अभाव असल्याने ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिक अडचणींचा सामना करावा लागत होता. हा कायदा एक मैलाचा दगड होता ज्याने ग्राहकांना त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करून त्यांना सक्षम केले. (National Consumer Rights Day)

(हेही वाचा – Uttar Pradesh मध्ये 3 खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान)

राष्ट्रीय ग्राहक दिन १९८६ पासून साजरा केला जातो. २४ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय संसदेत ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. यानंतर २०१९ मध्ये कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या. दुरुस्तीनंतर हा कायदा २० जुलै २०२० पासून लागू झाला आहे. हा कायदा ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना शोषणापासून संरक्षण देण्यासाठी करण्यात आला. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोट्या उत्पादनचे वर्णन किंवा उत्पादने आणि सेवांच्या कोणत्याही प्रकारची हमी देणाऱ्या शिक्षेचाही समावेश आहे. (National Consumer Rights Day)

(हेही वाचा – ICC Test Championship : भारताला कसोटी अजिंक्यपदासाठी पाकिस्तानची होऊ शकते मदत)

प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे, यामध्ये त्याचा व्यवसाय, वय, लिंग, समुदाय आणि धार्मिक विचारसरणीचा विचार केला जात नाही. ग्राहकांचे कल्याण आणि हक्क आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. “जागतिक ग्राहक अधिकार दिन” दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो. आज राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिन आहे. या दिनानिमित्त आपण ग्राहकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी मिळून पावले उचलुयात. (National Consumer Rights Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.