National Doctor’s Day: १ जुलै रोजी आपण ‘डॉक्टर्स डे’ का साजरा करतो? आज कोणाचा आहे जन्मदिन? 

147
National Doctor’s Day: १ जुलै रोजी आपण ‘डॉक्टर्स डे’ का साजरा करतो? आज कोणाचा आहे जन्मदिन? 
National Doctor’s Day: १ जुलै रोजी आपण ‘डॉक्टर्स डे’ का साजरा करतो? आज कोणाचा आहे जन्मदिन? 

जन्मापासून ते शेवटापर्यंत लोकांना डॉक्टरांची गरज भासतेच. लोक त्यांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या घेऊन डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर लोकांवर उपचारही करतात. कदाचित त्यामुळेच डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. म्हणूनच डॉक्टरांचा सन्मान ठेवण्यासाठी दरवर्षी १ जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ साजरा केला जातो.  (National Doctor’s Day)

डॉक्टर बिधन चंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) हे एक भारतीय डॉक्टर (Indian doctor), शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी १९५० ते १९६२ सालादरम्यान आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यांनी आपल्या कार्यकाळात सॉल्ट लेक, कल्याणी आणि दुर्गापूर या शहरांमध्ये महत्वाची कामं केली. १९६१ साली डॉक्टर बिधन चंद्र रॉय यांना ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.   (National Doctor’s Day)

(हेही वाचा – T20 World Cup : विजेत्या टीम इंडियाला ICC कडून २० कोटी, तर BCCI ने बक्षीस म्हणून दिले १२५ कोटी)

त्यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला होता. दरवर्षी १ जुलै या दिवशी भारतात डॉक्टर बिधन चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात येतो. डॉ. रॉय इतके हुशार होते की दोन वर्षांतच त्यांनी एकाच वेळी फिजिशियन आणि सर्जनची पदवी मिळवली. विधानचंद्र रॉय १९११ मध्ये भारतात परतले आणि त्यांनी सियालदह येथे सरकारी डॉक्टर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि त्यांनी या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.  (National Doctor’s Day)

(हेही वाचा – नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेची न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढेल; राज्यपाल Ramesh Bais यांचा विश्वास)

डॉक्टर्स डे (National Doctor’s Day) जगातील प्रत्येक देशात वेगवेगळ्या दिनांकांना साजरा केला जातो. भारतात दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) दरवर्षी देशात राष्ट्रीय वैद्यकीय दिन कार्यक्रम आयोजित करते. कोरोनासारख्या महामारीशी झुंज देत असताना डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका निभावली. हे आपण कधीच विसरु शकत नाही. त्यामुळे डॉक्टर्स डे साजरा करुन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करुया. (National Doctor’s Day)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.