National Film Awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर; ‘हा’ ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा

212
National Film Awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर; 'हा' ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमाNational Film Awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर; 'हा' ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा
National Film Awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर; 'हा' ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards 2024) घोषणा नुकताच करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नावे घोषित करण्यात आली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलाकारांचा गौरव हा केला जाणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कांताराला पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टी याला पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरज बर्जाद्या मिळाला असून चित्रपट उंचाईसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

(हेही वाचा –काँग्रेस- शरद पवार गटाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा; मी त्याला पाठिंबा देतो – Uddhav Thackeray)

मराठी चित्रपट वाळवीला देखील 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार मिळालाय. नौशाद सदर खानला या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला. फौजा चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. अट्टम या मल्याळम चित्रपटाला 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला आहे. बॉलिवूड चित्रपट ब्रह्मास्त्र याला देखील या पुरस्कार मिळालाय. र्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार प्रीतमला ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी मिळाला आहे. (National Film Awards 2024)

(हेही वाचा –Assembly Elections : मतदाराला मोबाईल क्रमांक मतदार यादीसोबत जोडण्याची सुविधा)

पोन्नियिन सेलवन 1 चित्रपटाला तामिळमधील बेस्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. कार्तिकेय 2 चित्रपटाला तेलगूमधील बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. KGF Chapter 2 ला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. मनोज बाजपेयी यांना गुलमोहरसाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला आहे. सूरज बडजात्या यांना ‘उंचाई’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. नीना गुप्ता यांना पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पवन मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. (National Film Awards 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.