दिवाळीत जाणार 597 नर्सेसची नोकरी; सेवा समाप्तीचे सहसंचालकांचे आदेश

152

सन 2022-2023 या आर्थिक वर्षात प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजुरी नाकारल्याने राज्यातील 597 परिचारिकांची सेवा समाप्त केली जाणार आहे. याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डाॅक्टर विजय कंदेवाड यांनी सर्वच मुख्य कार्यकारी अधिका-यांना पत्र पाठवले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्यामध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्राकरता 3 हजार 207 पदांची मंजुरी केंद्र शासनाकडे प्रस्तावित केली होती. परंतु केंद्र शासनाने 2 हजार 610 पदांनाच मंजुरी दिली असून, इतर 597 पदांना नामंजुरी दिली आहे. त्यामुळे या सर्व परिचारिकांची सेवा तत्काळ समाप्त करावी, असे सांगितले आहे.

( हेही वाचा: Nirav Modi Property seize: नीरव मोदीच्या 39 मालमत्ता जप्त होणार; ‘या’ मालमत्तांचा समावेश )

या तीन मुद्यांवरुन होणार कमी

मागील वर्षभरात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिकांची पदे रद्द करावी, ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे. तसेच,  ज्यांची सेवा कमी झालेली आहे, त्यांना कमी करावे, असे पत्रात म्हटले आहे.

मागील वर्षीही सेवा समाप्त

मागच्याच वर्षीही एवढ्याच परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली होती. अनेक जिल्ह्यांतील अधिका-यांनी त्यांना कार्यमुक्तही केले होते, परंतु अचानक रात्रीच्या सुमारास आदेश बदलून त्यांची सेवा समाप्त करु नये, असे सांगण्यात आले होते. आता पुन्हा अशाच प्रकारे आदेश निघेल आणि सेवा टिकून राहील, अशी अपेक्षा या 597 परिचारिकांना  आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.