दहशतवादाला चालना देणा-या व्हॉईस ऑफ हिंद वर एनआयएची कारवाई! काय आहे प्रकरण

एजन्सीचा आरोप आहे की या मासिकाचा उद्देश राज्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भडकवणे हा आहे.

156

राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने जम्मू -काश्मीरमधील व्हॉईस ऑफ हिंद मासिकाच्या 16 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. याबाबत माहिती देताना, एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियतकालिकाचे प्रकाशन आणि आयडीच्या पुनर्प्राप्तीच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. एजन्सीचा आरोप आहे की या मासिकाचा उद्देश राज्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भडकवणे हा आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जातीय द्वेष पसरवून दहशतवादाला हवा देणे हा व्हॉईस ऑफ हिंद या मासिकाचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी मासिकात प्रक्षोभक लेख प्रसिद्ध झाले आहेत, अशी माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचाः जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला! शिक्षकांची हत्या)

कर्नाटकातून केली अटक

एजन्सीने अलीकडेच कर्नाटकातील भटकळमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले होते. येथून व्हॉईस ऑफ हिंद मासिकाशी संबंधित प्रकरणात मुख्य आरोपी जवाहर दामुडीला अटक करण्यात आली. देशाविरोधात हिंसक जिहाद करण्यासाठी तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि त्यांना इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे षडयंत्र रचल्याबद्दल या वर्षी 29 जून रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जम्मू-काश्मीर येथे शोधमोहीम

एनआयएने याच प्रकरणात 11 जुलै रोजी जम्मू -काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला आणि उमर निसार, तनवीर अहमद भट आणि रमीज अहमद लोन या तीन आरोपींना अटक केली. हे सर्वजण अनंतनाग जिल्ह्यातील अचबल भागातील रहिवासी होते. त्यापैकी एक होता आयएसआयचा मुख्य ऑपरेटर अबू हजीर अल-बद्री. व्हॉईस ऑफ हिंदचे दाक्षिणात्य भाषेत भाषांतर आणि प्रचार करण्याचे काम करत होता. जवाहर दामुडी अशी त्याची ओळख होती. एनआयए आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्तपणे त्याला अटक केली.

(हेही वाचाः काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने उचलले मोठे पाऊल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.