National Post Week 2022: सहा महिन्यांत महाराष्ट्र पोस्टाची ५०० कोटींची कमाई

117

आधुनिकतेची कास धरत खासगी कुरिअर कंपन्यांना तुल्यबळ टक्कर देणाऱ्या महाराष्ट्र पोस्ट सर्कलने अवघ्या सहा महिन्यांत ५०० कोटींची कमाई केली आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल वीणा श्रीनिवास यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना ही माहिती दिली.

(हेही वाचा – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची दाऊद टोळी विरुद्ध मोहीम, खंडणी प्रकरणात ५ जणांना अटक)

कोरोनाने माणसा-माणसांत शारीरिक अंतर तयार केले असले, तरी भावनिक दुरावा निर्माण करण्यात तो सपशेल अपयशी ठरला. नात्यांतील वीण अतूट ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या असंख्य हातांची मेहनत त्यामागे आहे. टपाल विभाग हा त्यातील महत्त्वाचा घटक या वैश्विक महामारीला न डगमगता महाराष्ट्र पोस्ट सर्कलने अखंड सेवा देण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांवर भर दिला. आजमितीस राज्यातील अधिकांश पोस्ट कार्यालयांमधील व्यवहार ‘कॅशलेस’ चालतात, असे श्रीनिवास यांनी सांगितले.

बर्न येथे मुख्यालय असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत भारतीय टपाल विभागाने ९ ते १३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पोस्ट फॉर प्लॅनेट’ ही यंदाची संकल्पना आहे.

२०२२-२३ मधील महाराष्ट्र सर्कलची कमाई

• पोस्टल ऑपरेशनमधील उत्पन्न – ३४७.०८ कोटी
• स्पीड पोस्ट (डॉक्युमेंट) – १३०.०८ कोटी
• स्पीड पोट (पार्सल) – १५.३६
• बिझनेस पार्सल – २.३१ कोटी
• रजिस्टर्ड पार्सल – ६.९४ कोटी
• लॉजिस्टक पार्सल – ५ लाख

राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त उपक्रम

११ ऑक्टोबरला ‘फिलाटेली दिवस’: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘एक जिल्हा एक उत्पादन’ संकल्पनेवर ९ विशेष लिफाफ्यांचे प्रकाशन.

१२ ऑक्टोबरला ‘मेल आणि पार्सल दिवस’ – १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्व प्रकारच्या इनबाउंड आणि आउटबाउंड मेलसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोस्टमार्क कॅन्सलेशन जारी केले जाईल. मोठ्या ग्राहकांना पार्सल ट्रॅकर अंतर्गत नवीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले जाईल.

१३ ऑक्टोबर रोजी ‘अंत्योदय दिवस’ : टपाल खात्याच्या सामान्य माणसाच्या जीवनातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जाईल. ग्रामीण, दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती सह आधार नोंदणी आणि अद्यावतन शिबिरे आयोजित केली जातील

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.