Project Cheetah : तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्त्यांचे पुनरागमन; पंतप्रधानांना वाढदिवशी मिळणार ग्रेट भेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. यंदा पंतप्रधानांचा वाढदिवस एका विशेष कारणासाठी खास ठरणार आहे. कारण या दिवशी सुमारे सात दशकानंतर चित्त्यांची एक टीम भारतात दाखल होणार आहे. ७० वर्षांनंतर नामिबियातून आठ चित्ते भारतात येणार असून या चित्त्यांना प्रथम कार्गो विमानातून नामिबियातून जयपूरला आणण्यात येणार आहे. यानंतर त्याच दिवशी हे चित्ते हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणले जातील.

( हेही वाचा : T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे Sold Out, ‘या’ तारखेला असणार महामुकाबला )

७० वर्षांनी भारतात चित्त्यांचे पुनरागमन

कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणल्या जाणाऱ्या चित्त्यांच्या संवर्धनासाठी इंडियन ऑइल कंपनी पुढे आली असून या चित्त्यांवर ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. भारतातून नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्त्यांचे पुनरागमन होणार आहे. १७ सप्टेंबरला नामिबियावरून ८ चित्त्यांची पहिली बॅच भारतात दाखल होईल.

नामिबियातून आलेल्या आठ चित्त्यांमध्ये पाच माद्या आणि तीन नर आहेत. त्यांना आणण्यासाठी भारताचा संघ रविवारी नामिबियाला रवाना झाला आहे. या सर्व चित्त्यांना तीन दिवस क्वारंटाईन केले जाईल यावेळी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नामिबियामधून सलग १६ तास प्रवास करू शकेल असे जंबोजेट चित्ते आणण्यासाठी सज्ज आहे. प्रवासात चित्त्यांना उलट्या होतात यादरम्यान त्रास कमी व्हावा यासाठी रात्रीचा प्रवास करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशात या चित्त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here