आफ्रिकेतील नामिबियातून आठ चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधून हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. नामिबियातून विशेष विमानाने या ८ चित्त्यांना भारतात आणण्यात आले. ८ चित्त्यांमध्ये ५ मादी आणि ३ नर चित्ते आहेत.
७० वर्षांनी भारतात चित्त्यांचे पुनरागमन
कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणल्या जाणाऱ्या चित्त्यांच्या संवर्धनासाठी इंडियन ऑइल कंपनी पुढे आली असून या चित्त्यांवर ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. भारतातून नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्त्यांचे पुनरागमन झाले आहे.
( हेही वाचा : Bank Holiday In October : ऑक्टोबर महिन्यात एवढे दिवस राहणार बॅंका बंद! लगेच उरकून घ्या महत्त्वाची कामे )
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली असून याठिकाणी सुरूवातीला त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरूवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.