National Security Day : मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची सुरक्षा मजबूत

देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा अर्धसैनिक दले आणि पोलीस हे नक्षल प्रभावित चार राज्यांमध्ये कारवाई करत असताना दिसत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेला भूभाग कमी होऊ लागला आहे. पुढच्या २-३ वर्षांत मध्य भारतातून नक्षलवादाचे पूर्णतः कंबरडे मोडले जाईल.

336
National Security Day : मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची सुरक्षा मजबूत
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन

२०१४ साली मोदी सरकार आल्यापासून भारताची संरक्षण व्यवस्था (National Security Day) आणि युद्धनीतीमध्ये प्रचंड सकारात्मक फरक झाला आहे. आपण जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विचार करतो, तेव्हा ती दोन भागात विभागतो. एक बाह्य सुरक्षा आणि एक अंतर्गत सुरक्षा. बाह्य सुरक्षेचे दोन मोठे धोके आहेत, चीन आणि पाकिस्तान. तर अंतर्गत सुरक्षेचे दोन मोठे धोके आहेत, नक्षलवाद आणि बांगलादेशी घुसखोरी. नक्षलवाद जो मध्य भारतामध्ये आहे. तर बांगलादेशी घुसखोरी अवघ्या देशात अविरत सुरु आहे. याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद किंवा प्रॉक्सी वॉर सुरु आहेत, तर ईशान्य भारतातही बंडखोरी सुरु आहे, ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेची आव्हाने आहेत.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आखली मोहीम; पंतप्रधान मोदी येत्या १० दिवसांत करणार १२ राज्यांचा दौरा)

…आणि पाकिस्तानला बसला धक्का

कालपर्यंत भारतात बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून दहशवाद व्हायचा, मात्र यात फरक पडला आहे. आता पाक पुरस्कृत दहशतवाद हा केवळ काश्मीर पुरता सीमित राहिला आहे. कारण पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला आपण भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे उत्तर दिल्याने पाकिस्तानला जोरदार धक्का बसला. त्यानंतर पाकिस्तानने काश्मीरच्या बाहेर इतर कुठेही दहशतवादी हल्ले करणे पूर्णपणे थांबवले आहे. (National Security Day)

आता काश्मीरमध्येही दहशतवाद्यांचे कंबरडे जवळजवळ मोडण्यात आले आहे. तिथे केवळ १००-२०० दहशतवादी शिल्लक आहेत, ते हिंदू नागरिक, स्त्रिया अशांना सॉफ्ट टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले करत आहेत. म्हणजे पाकिस्तानसंबंधी बाह्य सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक, लोकसभेचे जागावाटप अंतिम करणार)

चीनकडील सीमा सुरक्षित झाली : 

हेच चीनच्या बाबतीत झाले. पूर्वी चीन घुसखोरी करायचा आणि आपण त्याला प्रत्युत्तर देऊ शकत नव्हतो. कारण आपले रस्ते सीमा भागापर्यंत पोहचले नव्हते, ते कुठे १०० किमी, तर कुठे १५० किमी सीमेपासून मागे होते. याउलट चीनचे रस्ते सीमा भागापर्यंत पोहचले आहेत. गेल्या १० वर्षांत बहुतेक रस्ते सीमा भागापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आपल्याला चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत आहे. चीनकडून घुसखोरी केल्यावर आपण त्याची चांगलीच पिटाई करत आहोत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गलवान. जेथे चीनकडून घुसखोरी होत असताना ती घुसखोरी आपण थांबवली. अशा प्रकारे आपण चीनकडील सीमा सुरक्षित केली आहे. मात्र येणाऱ्या काळात आपल्याला सीमावर्ती भागात रस्ते पूर्णपणे तयार केले पाहिजे. (National Security Day)

२-३ वर्षात नक्षलवाद देशातून संपून जाईल : 

देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा अर्धसैनिक दले आणि पोलीस हे नक्षल प्रभावित चार राज्यांमध्ये कारवाई करत असताना दिसत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेला भूभाग कमी होऊ लागला आहे. पुढच्या २-३ वर्षांत मध्य भारतातून नक्षलवादाचे पूर्णतः कंबरडे मोडले जाईल. मात्र त्यासाठी छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ओरिसा या चार राज्यांमध्ये जिथे नक्षलवाद्यांचे प्राबल्य आहे. त्या राज्यांतील अर्धसैनिक दले आणि पोलीस यांनी जास्त आक्रमक होऊन कारवाई केली पाहिजे. (National Security Day)

(हेही वाचा – Pravin Darekar : केवळ भाषणे देऊन, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत)

ईशान्य भारताच्या बंडखोरीचा विषयही महत्वाचा आहे. तिथे सैन्याने केलेल्या कारवाईमुळे जवळजवळ बंडखोरी संपलेली आहे. मात्र दुर्दैवाने मागच्या वर्षी मणिपूर येथे गडबड झाली, तिथे मैतेई आणि कुकी समाजात गृहयुद्ध सुरु झाले. हे आता कमी झालेले आहे मात्र संपलेले नाही. येणाऱ्या वर्षांत ही गृहयुद्धे थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.बाकीच्या भारतात दहशतवादी हल्ले होताना दिसत नाही. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

एनआरसीद्वारे बांगलादेशी घुसखोरांना पकडावे लागणार : 

बांगलादेशी घुसखोरीच्या विषयाबाबत तेथील घुसखोरी आपण बऱ्यापैकी थांबवली आहे, पण पश्चिम बंगाल या राज्यामुळे पूर्णतः संपलेली नाही. तिथे आपल्याला अजून प्रयत्न करून सीमा सुरक्षित करावी लागणार आहे. भारतात जे ४-५ कोटी बांगलादेशी घुसखोर घुसले आहेत, त्यांना एनआरसीच्याद्वारे शोधून पकडून पुन्हा बांग्लादेशात परत पाठवावे लागेल. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये यावर ठोस कारवाई केली जाईल अशी आशा करूया. भारत – म्यानमार सीमेवरून मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. तिथे सरकार आता कुंपण लावणार असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश येणार आहे. (National Security Day)

शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये भारत स्वयंपूर्ण : 

सागरी सुरक्षेविषयीचा विचार करता कोस्ट गार्ड आणि नौदलाच्या मदतीने सागरी सुरक्षा चांगली होत आहे. गेल्या वर्षभरात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जे समुद्रीमार्गाने भारतात येत होते ते आपण पकडले आहेत. याचा अर्थ आपली सागरी सीमा सुरक्षित झाली आहे. मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशाची संरक्षण व्यवस्था उत्तम राहिल्याने भारताची आर्थिक प्रगतीही चांगली होत आहे.

(हेही वाचा – Sunil Deodhar : पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार)

फक्त बांगलादेशी घुसखोरी थांबवावी लागेल. कालपर्यंत भारत सैन्यांसाठी ७० टक्के शस्त्रे आयात करत होता, आता केवळ ३० टक्के शस्त्रे आयात करत आहे. याचा अर्थ बहुतेक महत्वाची शस्त्रे आपल्याच देशात बनत आहेत. मेक इन इंडियाला चांगले यश मिळत आहे. शस्त्र निर्यातीत भारत पहिल्या २५ देशांमध्ये पोहोचला आहे. जर मोठे युद्ध झाले तर आपल्याला आपल्याच शस्त्रांनी आणि दारुगोळ्याने लढता येईल ही एक चांगली बाब आहे. (National Security Day)

थोडक्यात गेल्या काही वर्षांमध्ये भारताची अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा ही मजबूत झाली आहे परंतु आता चीन आपल्या विरुद्ध एक हायब्रीड युद्ध किंवा मल्टी डोमेन युद्ध लढत आहे. त्यामध्ये चीनचा मुकाबला कसा करायचा हा एक वेगळाच विषय होईल, त्याविषयी नंतर केव्हातरी.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.