चंद्रयान 3 (National Space Day) मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरू येथील इस्रोच्या (ISRO) कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. चंद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
त्यांचे शरीर आणि मन आनंदाने भरून गेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी पीएम मोदींनी घोषणा केली की, यापुढे दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ (National Space Day) म्हणून साजरा केला जाईल.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदी म्हणाले की; 23 (National Space Day) ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जात नाही आहे. प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा तो माझ्या डोळ्यासमोर फिरत आहे. 23 ऑगस्टला भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस आता ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाईल. पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जगाने आपल्या शास्त्रज्ञांचे आणि वैज्ञानिक प्रतिभेचे कौतुक केले आहे. चांद्रयान-3 मोहिमेतील महिला वैज्ञानिकांच्या योगदानाचेही पंतप्रधान मोदींनी यावेळी कौतुक केले.
चंद्रयान ३ मोहिम (National Space Day) यशस्वी झाल्यानंतर ‘मी लवकरच तुमची भेट घेईन’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In ISRO) यांनी इस्रोच्या शात्रज्ञांना सांगितले होते. त्यानुसार आज म्हणजेच शनिवार २६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या चंद्रयान टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण टीमच्या कामाचे कौतुक केले. तसेच मी तुम्हाला भेटण्यास उत्सुक होतो असंही मोदी म्हणाले. सर्वांची भेट घेऊन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या टीमशी संवाद साधला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community