’16 जानेवारी’ हा दिवस आता ‘नेशनल स्टार्ट-अप डे’

88

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्टार्टअप व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच नाविन्यपूर्णतेचे आकर्षण निर्माण करणे हा आमचा प्रयत्न आहे. यावेळी पंतप्रधानांनी घोषणा केली, की दरवर्षी 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस साजरा केला जाईल. ते म्हणाले, मी देशातील सर्व स्टार्ट अप्सचे, सर्व इनोवेटिव तरुणांचे, जे स्टार्ट-अप्सच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत त्यांचे अभिनंदन करतो. स्टार्ट-अपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहचावी, यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये 

या दशकाला भारताचा techade  म्हटले जात आहे. या दशकात इनोव्हेशन, इंटरप्रेन्यूरशीप आणि स्टार्ट अप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. त्याची तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्स सिलोसपासून मुक्त करणं हे होय. दुसरं वैशिष्ट्यं म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणं आणि तिसरं तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणं हे होय, असं मोदी म्हणाले.

तरुणांना संधी

देशात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याचे आकर्षण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 9 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅब मुलांना शाळेत नवनवीन शोध घेण्याची आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत ​​आहेत. ड्रोनचे नवे नियम असोत किंवा नवीन अवकाश धोरण असो, जास्तीत जास्त तरुणांना नवनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. आमच्या सरकारने आयपीआर नोंदणीशी संबंधित नियमही सोपे केले आहेत.

( हेही वाचा :चला…आता नवी मुंबईकरांचीही प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवसापासून धावणार मेट्रो )

भारताची रँकिंग सुधारली

2013-14मध्ये 4 हजार पेटंट्सला मंजुरी मिळाली होती. तर गेल्यावर्षी 28 हजाराहून अधिक पेटंट्सला मंजुरी देण्यात आली आहे. 2013-14मध्ये सुमारे 70 हजार ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली होती. तर 2020-21मध्ये अडीच लाखाहून अधिक ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली आहे. 2013-14 केवळ 4 हजार कॉपीराईट्सला मंजुरी मिळाली होती, गेल्यावर्षी ही संख्या वाढून 16 हजाराच्या पुढे गेली आहे. इनोव्हेशनबाबत देशात मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सममध्ये भारताची रँकिंग सुधारली आहे. 2015 मध्ये या रँकिंगमध्ये भारत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.