तंत्रज्ञानामुळे (Technology) आपल्या प्रत्येक गरजा पूर्ण होतात. आज माणूस मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. भारताला आपले तंत्रज्ञान उच्च पातळीवर न्यायचे आहे. म्हणूनच भारताचे सरकार तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे आयोजन करते. ११ मे १९९८ रोजी अणुचाचणी घेतल्यामुळे १९९८ मध्ये भारत एक उदयोन्मुख आण्विक शक्ती बनला. म्हणूनच भारताच्या पंतप्रधानांनी १९९९ हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. (National Technology Day)
भारताने ११ मे रोजी आपली सर्वात शक्तिशाली अणुचाचणी केली होती. म्हणूनच या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी आणि भविष्यातही उच्चतम कामगिरी करण्याचे प्रोत्साहन मिळवण्यासाठी दरवर्षी ११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. भारतात जलदगतीने तंत्रज्ञान (Technology) विकसित व्हावे आणि त्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस सुरू करण्यात आला. (National Technology Day)
(हेही वाचा – Open AI Search Engine : मायक्रोसॉफ्टचा पाठिंबा असलेली ओपन एआय कंपनी सोमवारी करणार सर्च इंजिनची घोषणा)
ही आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची थीम
या दिवशी तंत्रज्ञानाच्या (Technology) क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. तंत्रज्ञान विकास मंडळातर्फे स्वदेशी तंत्रज्ञानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांना पुरस्कार दिले जातात. तरुण पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी प्रेरणा मिळाली म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जातात. (National Technology Day)
केंद्र सरकार, संशोधन विभाग आणि संबंधित कार्यालये हा दिवस एकत्रितपणे साजरा करतात. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day) साजरा करण्यासाठी दरवर्षी एक नवीन थीम ठेवली जाते, २०२४ साठी देखील एक नवीन थीम ठेवली आहे, ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’. स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे. सध्याची भारताची घोडदौड पाहता भविष्यात भारत जापानलाही मागे टाकू शकेल. (National Technology Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community