Railway Security Force: रेल्वे सुरक्षा दलाद्वारे मानवी तस्करी विरुद्ध देशव्यापी मोहीम

आदेश आणि नियंत्रणाच्या एकात्मिक रचनेअंतर्गत आरपीएफची देशभरात व्याप्ती आहे. गेल्या काही वर्षांत, आरपीएफने प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक कार्यक्षम प्रतिसाद यंत्रणा विकसित केली आहे. याला आणखी गती देण्यासाठी, जुलै 2022 मध्ये रेल्वेद्वारे मानवी तस्करी विरुद्ध एक महिनाभर चालणारी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. आरपीएफच्या फील्ड युनिट्सना (क्षेत्रीय दलांना) मानवी तस्करी आणि मानवी तस्करी प्रकरणांचा शोध घेण्याबाबत प्राप्त झालेल्या माहितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या संदर्भात राज्य पोलीस, एलईए आणि इतर भागधारकांशी समन्वय साधून काम करण्याचा सल्ला देण्यात आला.

(हेही वाचा – RTO चा नवा नियमः लायसन्समधील ही गोष्ट तपासून घ्या, नाहीतर 5 हजार दंड भरा)

विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना देखील या दिशेने केलेल्या प्रयत्नांमध्ये समन्वय आणण्यासाठी आरपीएफ बरोबर संयुक्त कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. महिन्याभरात, एएएचटी अभियाना अंतर्गत केलेल्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे 151 अल्पवयीन मुले, 32 अल्पवयीन मुली (एकूण 183 अल्पवयीन) आणि 3 महिलांची मानवी तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आणि 47 मानवी तस्करांना अटक करण्यात आली आहे.

या मोहिमेने रेल्वेद्वारे मानवी तस्करी विरोधात संयुक्त कारवाई करण्यासाठी सर्व भागधारकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मोहिमेदरम्यान विविध संस्था आणि भागधाराकांमध्ये निर्माण झालेला सलोखा आणि सुरळीत समन्वय भविष्यात देखील मानवी तस्करी विरूद्ध शाश्वत मोहीम सुरू करायला उपयोगी ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here