“सावधान! पुढे…”; नवले पुलावरील वाढत्या अपघातानंतर पुणेकरांच्या ‘पुणेरी पाट्या’

नवले ब्रिज या ठिकाणची आपघाताची मालिका काही केल्या थांबत नाही. रविवारी रात्री एका ट्रक चालकाने तब्बल २५ वाहनांना उडवले होते. या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले होते. यानंतर याच पूलावर सलग एकामागून एक अपघात होत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवले पूल होणाऱ्या भीषण अपघातांमुळे चर्चेत आहे.

दरम्यान, पुणेकरांनी या पुलावर पुणेरी पाट्या लावल्याचे सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या मोठ्या अपघातानंतर त्याच रात्री लगेचच आणखी दोन ते तीन अपघात या ठिकाणी झाले. त्यामुळे प्रशासनाचे या पूलावरील सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावधान पुढे नवले पूल आहे, असे पोस्टर नवले पूल येथे लावण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Star Air: नाशिककरांसाठी मोठी बातमी! नाशिक-बेळगाव विमानसेवा फेब्रुवारीपासून पुन्हा होणार सुरू!)

असे आहे व्हायरल होणारे पोस्टर्स

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या जनजागृतीसाठी हे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर जांभूळवाडीपासून ते नऱ्हे सेल्फी पॉईंटपर्यंत लावण्यात आले आहे. हे पोस्टर्स सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसताय. नवले ब्रिजवर अपघात होणाऱ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर सावधान… पुढे नवले ब्रीज आहे, अशी सूचना लिहिलेली आहे, तर त्यावर तीव्र उतार आणि एका कावळ्याचा फोटो लावण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here