वाशी टोलनाक्यावर भीषण अपघात; डंपरची 12 वाहनांना जोरदार धडक

वाशी टोलनाक्यावर रविवारी भीषण अपघात घडला. या अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक डंपर टोलसाठी उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगेत घुसला. तब्बल 12 वाहनांना या डंपरने धडक दिली. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले. या अपघातानंतर वाशी टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

या अपघातानंतर डंपर चालकाने पळ काढला. परंतु त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. डंपर चालकाने आधीच गाडीतून उडी टाकल्याचाही अंदाज बांधला जात आहे. कारण डंपरमधील ड्रायव्हरच्या बाजूला असलेला दरवाजा उघडा असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

( हेही वाचा: आमदार संतोष बांगर हल्ल्याप्रकरणी 11 संशयित ताब्यात; हल्ल्यानंतर बांगर यांचे शिवसैनिकांना आव्हान )

टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी 

एसटी बस, टेम्पो, कार आणि काही दुचाकी या डंपरने चिरडल्या. एका कारमधील दोघा जणांना या अपघातात गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर अनेकजण अगदी थोडक्यात या अपघातातून बचावले. मात्र त्यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होऊन वाशी पुलापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनीही प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here