NAVI MUMBAI : तळोजा येथील एका इमारतीची लिफ्ट पडल्याने, चार कामगारांचा मृत्यू

Navi Mumbai Taloja तळोजा फेज 2 सेक्टर 36 मध्ये सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरु असताना, मंगळवारी सायंकाळी 6:15 वाजता क्रेन तुटून झालेल्या अपघातात चार मजुरांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाॅक्टरांनी कामगारांना केले मृत घोषित 

एवढ्या मोठ्या दुर्घटनेची माहिती सिडकोच्या नियंत्रण कक्षास उशिरापर्यंत मिळाली नव्हती. हे बांधकाम शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या घरांची निर्मिती केली जात आहे. जखमींना उपचारासाठी कामोठे एमजीएम येथे दाखल केले होते. मात्र डाॅक्टरांनी कामगारांना मृत घोषित केले.

सतरा मजली इमारतीचे काम सुरु असताना, अचानक संध्याकाळी लिफ्ट पडली, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. तुटलेल्या लिफ्टचा काही भाग तेथील एका कारवर पडला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here