पनवेल जवळ २२ प्रवाशांनी भरलेली एसटी आगीत झाली भस्मसात

161

नवी मुंबई पनवेल बस स्थानकातून महाडला जाणा-या एसटीला भीषण अपघात झाला. या अपघातात बसला अचानक आग लागल्याने गाडी संपूर्णपणे जळाली असून बसचा फक्त सांगाडा उरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. सकाळी 9:30 वाजता ही दुर्घटना घडली. बसमधून 22 ते 23 प्रवासी प्रवास करत होते. आग आटोक्यात आणेपर्यंत गाडीचावरील भाग जळाला होता.

ड्रायव्हरचे प्रसंगावधान

पनवेल बसस्थानकातून निघालेली बस महाडला जात असताना, कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या चढाला लागल्यानंतर, गाडीतून अचानक धूर निघायला लागला. ड्रायव्हरने गाडी थांबवत, प्रसंगावधान दाखवले आणि कंडक्टरने प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. त्यावेळी बसमध्ये 22 ते 23 प्रवासी होते. प्रवाशांनी भरलेली बस तत्काळ रिकामी करण्यात आली.

महिला प्रवाशाचे 15 हजार जळून खाक 

गाडीतून बाहेर निघताना, गडबडीत एका महिला प्रवाशाची बॅग गाडीतच राहिली. त्यामध्ये 15 हजार रुपये होते. या दुर्घटनेत महिलेचे 15 हजार रुपये जळाले. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. यावेळी पनवेल फायर ब्रिगेड आणि सिडको फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग लागलेली बस विझवली. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.