नवनाथ बन यांची महाराष्ट्र भाजपाच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती

पत्रकार नवनाथ बन यांची महाराष्ट्र भाजपाच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या १५ वर्षांपासून नवनाथ बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत, यापूर्वी त्यांनी दैनिक गावकरी, मराठवाडा नेता, स्टार माझा, एबीपी माझामध्ये काम केले आहे.
नवनाथ बन यांना माध्यम क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असून, ते भाजपची धोरणे व विचारांना पोहचविण्याचे काम करतील. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शुभेच्छा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here