मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याला मुंबई उपनगरातील खार येथील घर अनधिकृत आहे असे सांगितले होते. याठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांना खार येथील निवासस्थानी नियमांचे भंग करुन बांधकाम केल्याचे आढळले. त्यानंतर राणा दाम्पत्याला ७ दिवसांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु या नोटीसची मुदत आता समाप्त झाली असून कारणे दाखवा नोटीसीला राणा दाम्पत्यांनी दिलेली उत्तरे अमान्य करत अनधिकृत बांधकाम पाडावे नाहीतर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
( हेही वाचा : कोकण रेल्वे फुल्लं! चाकरमान्यांनी धरली परतीची वाट; उन्हाळी विशेष गाड्यांना दिली मुदतवाढ )
कारवाईचा इशारा
राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यांनंतर त्यांना शिवसैनिकांकडून तीव्र विरोध करण्यात आला. यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती याच दरम्यान पालिकेने त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत नोटीस पाठवली होती. परंतु आता कारणे दाखवा नोटीसीची मुदत संपल्यामुळे पुढील १५ दिवसांच्या आता राणा दाम्पत्याने अनधिकृत बांधकाम पाडावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
Join Our WhatsApp Community