दुर्गा पूजेदरम्यान मंडपाला आग; 64 जण होरपळले, दोघांचा मृत्यू

147

संपूर्ण देशभरात नवरात्रीचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी नवरात्र जल्लोषात साजरा केला जात आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील भदोहीमध्ये नवरात्रीच्या मंडपात रविवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 64 जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आगीत होरपळून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांवर वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भदोहीमध्ये दुर्गा पुजेदरम्यान मंडपाला आग लागली. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी मंडपात आग लागली त्यावेळी मंडपात तब्बल 150 भाविक उपस्थित होते. आग इतकी भीषण होती की, त्यामध्ये जवळपास 64 भाविक होरपळले. तर आगीत होरपळल्यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. भाविकांमधील होरपळलेले लोक 30 ते 40 टक्के भाजले आहेत. तर काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

( हेही वाचा: गृह युद्धातून ‘पीएफआय’ला गाठायचे होते ‘२०४७’ लक्ष्य )

जखमींना तातडीने मदत पुरवा- मुख्यमंत्री 

या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी त्यांनी अधिका-यांना निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील माहिती सीएमओद्वारे ट्वीट करुन देण्यात आली आहे. सीएम योगी यांनी अधिका-यांना निर्देश दिले आहेत. सीएमओने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, भदोही जिल्ह्यातील औरई येथील दुर्गा पंडालला लागलेल्या आगीच्या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन अधिका-यांना दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.