हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता! नवाब मलिकांची ईडीसमोर कबुली 

2002 सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता, अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या मनी लौडरिंग प्रकरणी अटकेत असलेले नवाब मलिक यांनी ईडीला दिली.

(हेही वाचा ATSच्या ताब्यात असलेल्या जुनैदने १० मुलांना दहशतवादी संघटनेत केले भरती)

सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते

नवाब मलिक यांनी जबाबात गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी आपणास माहिती नव्हत्या, असे सांगितले आहे. गोवावाला कंपाउंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचा भाऊ अस्लम मलिक यांचीही महत्वाची भूमिका आहे. 2005 साली मलिक यांनी सलीम पटेल विषयी लोकांना विचारले त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सांगण्यात आले, असेही मलिक म्हणाले. सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता, हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची, गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला 5 लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात 5 लाख आणि चेकमध्ये 5 लाख असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here