Naxalite : नक्षलवादी आणि मिशनऱ्यांची हातमिळवणी; काय आहे बस्तरमधील खरे वास्तव?

वैश्विक हिंदू अधिवेशनाच्या ५व्या दिवशी उद्बोधन सत्रात ' नक्षली आणि मिशनरी यांची देशभरातील आघाडी ' या विषयावर रचना नायडू बोलत होत्या.

182
Naxalite : नक्षलवादी आणि मिशनऱ्यांची हातमिळवणी; काय आहे बस्तरमधील खरे वास्तव?

जेथे खनिज संपत्ती आहे, तिथेच नक्षलवादी जास्त आहेत. याच छत्तीसगडमध्ये आशियातील सर्वात मोठे चर्च आहे. या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत कारण दोन्हींचा संबंध एकमेकांशी आहे. मिशनरी आदिवासीयांच्या हातात बायबल देतात, त्यांना प्रार्थना करायला लावतात, जेव्हा त्यांचे डोळे उघडतात तोवर त्यांची जामीन मिशनऱ्यांनी बळकावलेली असते, असे छत्तीसगड येथे नक्षलवादी भागाचा अभ्यास करणाऱ्या अधिवक्ता रचना नायडू म्हणाल्या.

वैश्विक हिंदू अधिवेशनाच्या ५व्या दिवशी उद्बोधन सत्रात ‘ नक्षली आणि मिशनरी यांची देशभरातील आघाडी ‘ या विषयावर त्या बोलत होत्या.

आदिवासी गौंड समाज हा हिंदूच आहे. ते शिवाची उपासना करत असतात. परंतु तरीही आदिवासी हिंदू नाहीत असा अपप्रचार आताच नाही तर तो ब्रिटिश राजवटीपासून सुरु आहे. ब्रिटिश आदिवासी यांचे धर्मांतर करून हिंदूला दुबळा बनवण्याचे प्रयत्न करत आले आहेत. छतीसगड येथील नारायणपूर येथे चर्च तोडले. त्याची मोठी बातमी झाली. हिंदू विरोधी इको सिस्टमने या विषयाला खूप पसरवले. ख्रिस्ती धोक्यात आहेत, असा प्रचार केला गेला. लागलीच मार्क्सवादी पक्षाच्या नेत्या वृंदा करात तिकडे आल्या, त्यांनी अकांडतांडव केले. यामागील वास्तव वेगळेच आहे. तिथे मिशनरी धर्मांतर करत होत्या. तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती मृत झाली तरी आम्ही जिवंत करू, अशा बतावण्या देत ते आदिवासीयांना भुलवत होते. हे सर्व घडत असताना हिंदू समाज मात्र त्या आदिवासीयांच्या मागे दिसला नाही. अशा परिस्थिती हिंदूंनी त्या आदिवासीयांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी इको सिस्टम तयार केली पाहिजे, असे रचना नायडू म्हणाल्या.

(हेही वाचा – Hindu : दंगलीतील पीडित हिंदूंसाठी काय करावे; आमदार कपिल मिश्रा यांनी सांगितला मार्ग)

नक्षलवाद्यांनी या भागातील जंगलाचे खऱ्या अर्थाने नुकसान केले आहे. तेंदुपत्ताच्या शेतीच्या माध्यमातून ते हफ्ता वसुली करत असतात. नक्षलवादी आदेश देतात तेंव्हा आदिवासी यांना त्यांचा मुलगा त्यांच्या स्वाधीन करावा लागतोच. त्या मुलाच्या हाती मग ते बंदूक देतात. नक्षलवादी यांचे टॉप कॅडर कुणीही बस्तरमध्ये नाही. खरे नक्षलवादी दुसरेच आहेत, ज्यांना पकडले जात आहे ते तेथील आदिवासी आहेत जे सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात, असे नायडू म्हणाल्या.

या नक्षलवाद्यांनी युक्रेन युद्धात रशियाच्या विरोधात जावून युक्रेनला पाठींबा दिला, किसान आंदोलनाला पाठींबा दिला, शाहीन बाग येथील मुसलमानाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पीएफआयला पाठींबा दिला आहे. सरकारची कोणतीही योजना हे या भागात लागू करू देत नाहीत. विकास करू देत नाहीत. अरुंधती रॉय नक्षलवाद्यांचे समर्थन करतात. अशा प्रकारे नक्षलवादी यांना सर्व बाजूने समर्थन मिळत आहे. अशा वेळी या ठिकाणी जनजागृती केली पाहिजे, आपल्या सुरक्षा जवानाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. त्यांच्या होत असलेल्या आरोपंकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असेही नायडू म्हणाल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.