भारताचा उत्कृष्ट विकेट कीपर Nayan Mongia

425

नयन मोंगिया (Nayan Mongia) हा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक होता. नयन रामलाल मोंगियाचा जन्म १९ डिसेंबर १९६९ रोजी बडोद्यात झाला. किरण मोरे नंतर तो भारताचा दुसरा सर्वात लोकप्रिय यष्टीरक्षक होता. १९९० मोंगियाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती.

९०च्या दशकात नयन मोंगियाला (Nayan Mongia) अनेकवेळा सलामी बॅट्समॅन म्हणून पाठवण्यात आले होते. त्याने खेळलेल्या ४४ पैकी १५ कसोटी सामन्यांमध्ये तो सलामीवीर म्हणून खेळला. त्याने २७.२९ च्या सरासरीने ६५५ धावा केल्या. १० ऑक्टोबर १९९६ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत नयन मोंगियाने डावाची सुरुवात करताना ३६६ चेंडूंचा सामना करत १५२ धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली, ज्यामुळे भारत हा सामना ७ गडी राखून जिंकला. एकाच कसोटीत ८ झेल घेणारा तो एकमेव कीपर ठरला.

(हेही वाचा Kashmiri Hindu : काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात भोगाव्या लागल्या नरकयातना !)

नयन मोंगियाने (Nayan Mongia) आपल्या कसोटी कारकिर्दीत एक शतक आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने १४० एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने १२७२ धावा केल्या आहेत. तो एक चांगला खेळाडू म्हणून नावारुपाला आला होता. मात्र  मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. मोंगियाने डिसेंबर २००४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २००४ मध्ये त्याची नियुक्ती थायलंड राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक म्हणून करण्यात आली. २००४ च्या इक्वाड ट्रॉफी मलेशियामध्येही तो प्रशिक्षक होता. राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त तो थायलंडच्या अंडर-१९ संघाचाही प्रशिक्षक होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.