मुंबईसह महामुंबई परिसरातील अमली पदार्थ तस्करी, विक्रीसह सेवन करणा-्यांचे तीन-तेरा वाजवणारे एनसीबीचे मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांना आता असुरक्षित वाटू लागले आहे, तशी कारणे त्यांनी पुराव्यासह महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना दिली आहेत. ज्यामध्ये त्यांनी अज्ञात व्यक्ती त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. त्या अज्ञात व्यक्ती पोलिस असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केल्याने प्रकरण गंभीर बनले आहे.
कोण आहे वानखेडे यांच्या मागावर?
यासंबंधी वानखेडे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे यांना भेटून सविस्तर माहिती दिली. समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये समीन वानखेडे यांच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून ते त्यांच्या आईच्या थडग्याचे दर्शन घेण्याकरता कब्रस्तानात गेले असता त्यांचा कुणीतरी पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंबंधी त्यांनी लागलीच पोलिस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेऊन याबाबतची सर्व माहिती दिली. जे कुणी वानखेडे यांचा पाठलाग करत होते, ते दोघे व्यक्ती असून त्या पोलिस असल्याचा संशय वानखेडे यांना आहे.
(हेही वाचा : बंदच्या नावाखाली सरकारपुरस्कृत दहशतवाद! फडणवीसांचा हल्लाबोल)
सीसीटीव्ही फुटेज दिले
समीर वानखेडे यांनी ते कब्रस्तानात गेले होते, तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. त्याच बरोबर त्यांनी ही सर्व माहिती मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिका-्यालाही भेटून् दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना आता वानखेडे यांच्या मागे असणारे गुप्तहेर कोण आहेत आणि कुणाच्या इशा-्यावरून ते वानखेडे यांचा पाठलाग करतात याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.
वानखेडे बनले टार्गेट
समीर वानखेडे यांनी अवघ्या मुंबईतील अमली पदार्थांचा धंदा उद्ध्वस्त केला. यामध्ये बॉलीवूडच्या दिग्ग्ज कलाकरांचा समावेश आहे. त्याच बरोबर वानखेडे यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा अमली पदार्थाचा धंदा उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे वानखेडे यांनी एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली आहे. आता नुकतेच त्यांनी किंग खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली आहे. तेव्हापासून वानखेडे यांच्यावर मलिक दररोज नवनवीन आरोप करून त्यांना लक्ष्य करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी व्यक्त केलेला संशय गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community