राजपूत प्रकरणात एनसीबीने दाखल केले आरोपपत्र! ३३ जणांची नावे

सुशांतसिंग राजपूत आत्महत्येत उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ने ११ हजार ७०० पानांचे आरोपपत्र शुक्रवारी न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रात एकूण ३३ आरोपींचा समावेश आहे, त्यापैकी ८ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, इतर आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांकडे तपास सुरू असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

३३ जणांना अटक

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येच्या तपासात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर, एनसीबीने ड्रग्स कनेक्शनचा तपास आपल्या हातात घेतला होता. या ड्रग्स कनेक्शनमध्ये एनसीबीने सुशांतसिंग राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह अनेक सेलिब्रिटी आणि ड्रग्स सप्लायर अशा एकूण ३३ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच अनेकांची या प्रकरणात एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या ३३ जणांपैकी ८ जण अद्यापही न्यायालयीन कोठडीत असून, इतरांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. एनसीबीने या खटल्याचे ११ हजार ७०० पानांचे आरोपपत्र शुक्रवारी न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रात एनसीबीने आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेले मोबाईल फोन्स, अंमली पदार्थ आणि इतर कागदपत्रे हे पुरावे जोडले आहेत.

ड्रग्स कनेक्शन समोर

गेल्या वर्षी १४ जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ माजली होती. या प्रकरणात काहीतरी संशयास्पद आहे, असे तपासात समोर येत होते. मग त्यावरुन या प्रकरणात समोर आले. ते ड्रग्स कनेक्शन. या ड्रग्स कनेक्शनच्या बाबतीत एनसीबीकडून गेले वर्षभर अनेक कारवाया करण्यात आला. अनेक जणांची चौकशी करण्यात आली. त्यानुसार अनेकांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले. आता एनसीबीने या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here