नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडून नांदेड जिल्ह्यातील कामठा येथे अंमली पदार्थाचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तयार करणारा कच्चा माल आणि इतर यंत्रे असा एकूण दीड लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आले आहे. नांदेड मधील ही दुसरी कारवाई असून यापूर्वी दीड हजार किलो गांजाने भरलेला ट्रक सह एकाला अटक करण्यात आली होती.
कामठा येथे तीन दुकानावर छापे
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाला गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून सोमवारी नांदेड जिल्हयातील कामठा या ठिकाणी तीन दुकानावर छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात एनसीबीला मोठ्या प्रमाणात अफुच्या बिया मिळून आल्या, या अफूच्या बियांवर या ठिकाणी प्रक्रिया करून त्याचे अंमली पदार्थात रूपांतर करून हे अंमली पदार्थ बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येत होते. एनसीबीने या दुकानातून मोठ्या प्रमाणात यंत्रे आणि सुमारे १११ किलो अफूच्या बिया, नोट मोजण्याचे यंत्र, २ ग्राईन्डर मशीन असा एकूण दीड लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – परमबीर सिंह, ३० दिवसांत हजर व्हा! न्यायालयाचा आदेश)
दीड हजार किलो गांजा
या प्रकरणी एनसीबी गुन्हा दाखल केला आहे. या कारखान्याचे मालक आणि हे अंमली पदार्थ कुठे विकले जात होते याची माहिती घेण्यात येत असल्याची माहाती एनसीबीने दिली आहे. दोन आठवड्यापूर्वी एनसीबीने नांदेड येथे एक ट्रक पकडला होता, या ट्रकमध्ये लोखंडी सळई त्याच्याखाली दीड हजार किलो गांजा मिळून आला होता. हा गांजा आंध्रप्रदेश येथून जळगाव येथे जाणार होता. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे राहणारे टाकले बंधू यांचा या गांजा होता. या टकेले बंधूचा शोध सुरु आहे.
Join Our WhatsApp Community