मुंबई टू गोवा ड्रग्स क्रूझः 8 जण ताब्यात! बड्या अभिनेत्याच्या मुलाची चौकशी, म्हणाला मी…

आपण क्रूझवर कसे पोहोचलो याची माहिती त्याने एनसीबीला चौकशीदरम्यान दिली आहे.

ड्रग्सचा मोठा साठा घेऊन मुंबई टू गोवा प्रवास करणा-या एका क्रूझवर शनिवारी रात्री एनसीबीने छापा टाकला. त्यावेळी क्रूझवर रेव्ह पार्टी करणा-या अनेकांना एनसीबीने आपल्या ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका बड्या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचा समावेश असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आपण क्रूझवर कसे पोहोचलो याची माहिती त्याने एनसीबीला चौकशीदरम्यान दिली आहे. याप्रकरणी तसेच 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

मी व्हीआयपी गेस्ट

या अभिनेत्याच्या मुलाने आपल्या चौकशीत आपल्याला व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलवलं असल्याचे सांगितले आहे. आपल्या नावाचा वापर करु बाकीच्यांना क्रूझवर बोलावले गेल्याचेही त्याने चौकशीत सांगितले आहे. पकडण्यात आलेल्या या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.

8 जणांविरोधात गुन्हा दाखल

आतापर्यंत एनसीबीने आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश असल्याचे समजत आहे. क्रूझवर एमडीएम, कोकेन, एमडी, चरस यांसारखे अंमली पदार्थ सापडले असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात येत आहे.

(हेही वाचाः ड्रग्स भरून क्रूझ निघाली मुंबई टू गोवा, पण…)

मुंबई ते गोवा होणार होती रेव्ह पार्टी

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबई बंदरातून गोवा येथे सुटणाऱ्या क्रूझमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली होती. तसेच मुंबई बंदरातून क्रूझ निघाल्यानंतर त्यामध्ये पार्टी सुरू होणार होती. एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे हे आपल्या पथकासह या क्रूझवर पाळत ठेवून होते. क्रूझ मुंबई बंदरातून गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर पार्टी सुरू होताच एनसीबीच्या पथकाने भर समुद्रात असणाऱ्या क्रूझच्या एका मजल्यावर छापा टाकला. तेव्हा तेथे रेव्ह पार्टी सुरू असल्याचे आढळून आले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here