आर्यननंतर आता अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर… काय आहे कनेक्शन?

98

शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आर्यन नंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

आता चंकी पांडेचे कन्यारत्न अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने धाड टाकली आहे. गुरुवारी टाकलेल्या या धाडीनंतर मन्नत या शाहरुखच्या बंगल्यावर सुद्धा एनसीबीने छापा मारला. बॉलिवूडमधील आणखी काही नावे एनसीबीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः मालदीवमध्ये फिल्म इंडस्ट्रीकडून वसुली! वानखेडेंच्या कुटुंबावर नवा आरोप)

आर्यन-अनन्याचे झाले चॅटिंग?

मुंबई ड्रग्स क्रूझ प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानच्या चौकशीत त्याचे काही व्हॉट्सअप चॅट एनसीबीच्या हाती लागले होते. ड्रग्सबाबत बॉलिवूडमधील एका नवोदित अभिनेत्रीसोबत आर्यनचे चॅट झाले असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली. ही अभिनेत्री अनन्या पांडे असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही अधिकृत खुलासा एनसीबीकडून करण्यात आलेला नाही. अनन्याच्या घरी एनसीबीने छापा मारल्यानंतर तिला चौकशीसाठी बोलवले असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः आर्यनला सत्र न्यायालयात ‘फटका’, उच्च न्यायालयात होणार का ‘सुटका’)

क्रूझवरील पार्टीत अनन्या हजर?

आर्यन खान आणि त्याची बहिण सुहाना खान यांची अनन्यासोबत चांगली मैत्री आहे. अनन्याने स्टुडन्ट ऑफ द इयर-2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 3 ऑक्टोबर रोजी कॉर्डिलिया क्रूझवर झालेल्या पार्टीत अनन्या सुद्धा हजर होती, अशी चर्चा आहे. अनन्याच्या चौकशीनंतर तिचं या प्रकरणी काही कनेक्शन आहे का, हे उघडकीस येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.