समीर खानचा जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीकडून न्यायालयात अर्ज

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)वर निशाणा साधला आहे. गुरुवारी मलिक यांच्या जावयाकडे पकडलेला अंमली पदार्थ हा गांजा नसून, हर्बल तंबाखू असल्याचा दावा करण्याता आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एनसीबीने म्हटले आहे की, हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून त्यांनी अहवाल नीट वाचावा. तसेच समीर खानचा जामीन रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

एनसीबीवर साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या जामीनावरील न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन मलिक यांनी गुरुवारी पुन्हा एनसीबीवर निशाणा साधला. एनसीबीने जप्त केलेल्या २०० किलो गांज्यापैकी राहिला फर्निचरवाला हिच्याकडे साडेसात ग्राम गांजा सापडला आहे. उर्वरित सर्व हर्बल तंबाखू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी आदेशात नमूद केलेल्या अहवालात म्हटले आहे.

एनसीबीला फरक कळतो का

एनसीबीला गांजा आणि तंबाखू मधील फरक ओळखता येत नसल्याचा आरोप मलिक यांनी केला. याबाबत एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्याकडे काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत, त्यांनी अहवाल नीट वाचावा असे वानखेडे यांनी म्हटले आहे.

दबाव आणण्याचा प्रयत्न

समीर खानला न्यायालयाने जामीन देताना काही अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र त्याने एनसीबीच्या अधिकारी यांचा मोबाईल क्रमांक जाहीर करुन अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून, समीर खानचा जामीन रद्द व्हावा यासाठी आम्ही उच्च न्यायालयाला अर्ज दाखल केला असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here