एनसीबीच्या मुंबई विभागाने मागील चार दिवसांत मुंबईत सहा ठिकाणी धाडी टाकून सुमारे १३ कोटी रुपयांचा अमली पदार्थ माल जप्त केला आहे. या प्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आले असून जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ वेगवगेळ्या देशांमध्ये पाठवण्यात येणार होता, अशी माहिती मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. या कारवाई दरम्यान एनसीबी चार दिवसात २.२९६ किलोग्रॅम अम्फेटामाइन, ३.९०६ किलो अफू, २.५२५ किलो झोलपीडेम टॅबलेट, असा अमली पदार्थ जप्त केला आहे.
४ ठिकाणी केली कारवाई
एनसीबी मुंबई विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंधेरी पूर्व येथील स्टेथोस्कोपमध्ये ४९० ग्राम अँफेटामाईन आस्ट्रोलीया येथे पाठवण्यात येत आहे, हे अमली पदार्थ डोंगरी येथून पाठवण्यात आले, याची माहिती मिळताच १० डिसेंबर रोजी एनसीबीने अंधेरी येथे सापळा रचून एका इव्होरियन नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील स्टेथोस्कोप तपासला असता त्यात ४९० ग्राम अँफेटामाईन मिळाले. याप्रकरणी या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान दुसरी कारवाई अंधेरी येथेच करण्यात आली असून एनसीबीने एक मायक्रोओव्हन ताब्यात घेऊन तो तपासला असता त्यात ३ किलो ९०६ ग्राम अफू हा अमली पदार्थ मिळाला. अमली पदार्थाने भरलेला मायक्रोओव्हन मुंबईहून मालदिव येथे पाठवण्यात येणार होता. या दरम्यान तिसऱ्या कारवाईत एनसीबीने अंधेरी येथून किरणा मालमध्ये दडवून ठेवलेले २.५२५ किलो झोलपीडेम टॅबलेट जप्त केले आहे. हे टँबलेट अमेरिका येथील टेक्सस या ठिकाणी पाठवण्यात येणार होते, चौथ्या कारवाईत सायकलिंग हेल्मेट आणि बांगड्या जप्त करण्यात आल्यानंतर त्या तपासल्या असता बांगड्या आणि हॅन्डल मध्ये ९४१ ग्रॅम अम्फेटामाइन जप्त करण्यात आला असून हे पार्सल आस्ट्रोलीय या ठिकाणी जाणार होते.
(हेही वाचा आधी प्रस्तावावर शंका, तरीही अध्यक्षांनी मंजूर केले!)
मुंबईतून परदेशात होणारी अमली पदार्थाची तस्करी रोखली
डोंगरी येथून काही खेळण्याचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले असून त्या बॉक्समध्ये असलेल्या नळीच्या पाईपमध्ये ८९५ ग्राम अम्फेटामाइन मिलन आले आहे. मुंबईतील डोंगरी येथून निघालेले हे पार्सल आणि दुबई, यूएई आणि न्यूझीलंड येथे या ठिकाणी जाणार होते. अंधेरी येथून स्वित्झर्लंडला निघालेले पार्सल एनसीबीने ताब्यात घेतले असता १ टीबी हार्ड डिक्समध्ये १७ ग्राम अम्फेटामाइन मिळाले आहे. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व पार्सल अंधेरी येथून एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनी मार्फत पाठवण्यात येणार होते. मागील चार दिवसांत एनसीबीने ही कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुंबईतून परदेशात होणारी अमली पदार्थाची तस्करी रोखली आहे.
Join Our WhatsApp Community