आता एनसीबीच्या अधीक्षकला अटक! कारण वाचून धक्काच बसेल

152

हैद्राबाद ते पुणे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. दिनेश चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या एनसीबीच्या अधीक्षकाचे नाव असून, ते नवी मुंबईत राहतात. प्रवासी महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

महिलेचा विनयभंग

एनसीबीचे अधीक्षक दिनेश चव्हाण हे हैद्राबाद येथे काही कामासाठी गेले होते. तेथून ते ट्रेनने परत येत असताना ट्रेनच्या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेसोबत त्यांनी अश्लील कृत्य करुन, या महिलेचा विनयभंग केला. दरम्यान या महिलेने आरडाओरडा करताच डब्ब्यातील इतर प्रवासी आणि तिकीट तपासनीस हे या महिलेजवळ आले. त्यांनी महिलेकडे चौकशी केली असता, तिने तिकीट तपासनीसाला दिलेल्या तक्रारीत दिनेश चव्हाण यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे.

(हेही वाचाः आर्यन खानला न्यायालयीन कोठडी)

काय आहे आरोप?

संशयित आरोपी दिनेश चव्हाण यांनी २५ वर्षीय पीडित महिला ही झोपेत असताना त्याने तिच्या अंगावर हात फिरवला. तसेच तिच्या बॅगेतून तिची अंतर्वस्त्रे काढून तो त्याचा वास घेत होता. त्याने तिच्या छातीवर हात ठेवताच पीडितेला जाग आली आणि तिने आरडाओरडा केला, अशी माहिती पीडित महिलेने केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सापडले एनसीबीचे ओळखपत्र

दरम्यान डब्ब्यातील तिकीट तपासनीसांनी संशयित आरोपी दिनेश चव्हाण यांना परळी रेल्वे स्थानकावर उतरवून परळी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. परळी रेल्वे पोलिसांनी पीडित प्रवासी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन चव्हाण यांना अटक करण्यात आली. त्याच्या अंगझडतीत रेल्वे पोलिसांना एनसीबी अधीक्षक असलेले ओळखपत्र आणि काही न्यायालयीन दस्तावेज सापडले. दरम्यान परळी पोलिसांनी खात्री करण्यासाठी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता, दिनेश चव्हाण हे एनसीबीचे अधीक्षक असल्याचे समोर आले.

(हेही वाचाः ‘हे’ आहेत जगातील पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश! भारताचा क्रमांक कितवा? वाचा)

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कुमार हे मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असून, त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याचे एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिका-यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.