चिंकूचा ‘बाजार’ उठला…

चिंकू पठाण कुख्यात गुंड करीम लाला याचा नातेवाईक असून दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध आहेत.

बुधवारी रात्री डोंगरी येथे एनसीबीने छापा मारत, या छापेमारीत हत्यारे, मोटारी, ड्रग्स आणि रोकड मोठ्या प्रमाणात सापडले आहे. या सर्वांमागे खूप मोठे रॅकेट असून अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबीने सोमवारी नवी मुंबईतून चिंकू पठाण याला अटक केली होती. चिंकू पठाण याचे डोंगरीत अनेक साथीदार असून त्यांच्यामार्फत तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रग्सचा धंदा करत होता.

‘अंडरवर्ल्डशी’ संबंध?

बुधवारी एनसीबीने पठाणच्या डोंगरी येथील बालेकिल्ल्यात कारवाई करून शस्त्रसाठा, ड्रग्स, रोकड आणि मोटारी ताब्यात घेतल्या आहेत, तसेच काही जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. या ड्रग्सच्या धंद्याचे थेट अंडरवर्ल्डशी सबंध असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा: आता करीमचा चिंकू अडकला!)

एनसीबीने केला ‘पर्दाफाश’

एनसीबीकडून महाराष्ट्रात एमडी ड्रग्स पुरवणारा ड्रग्स माफिया एनसीबीच्या रडारवर आला आहे. 6 किलो एमडी, 1 किलो केटामाईन आणि आणखी एक प्रकारचे ड्रग्स असे एकूण 12 किलो ड्रग्स एनसीबीने जप्त केले आहेत. तब्बल 2 करोड 80 लाख रुपयांची रोख रक्कम एनसीबीकडून हस्तगत करण्यात आली आहे. कालपासून नवी मुंबई, भिवंडी आणि डोंगरी परिसरात एनसीबीचे धाडसत्र जोरात सुरू आहे. डोंगरी परिसरात ड्रग्सचे उत्पादन करणाऱ्या लॅबचा एनसीबीकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

साखरेच्या पिशव्यांत ‘ड्रग्स’

अटक करण्यात आलेल्या गँगस्टर चिंकू पठाणकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरीत असणाऱ्या आरिफ भुजवाला याच्या घरी एनसीबीने छापेमारी केली होती. आरिफ भुजवाला सध्या फरार असून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. अनेक महागडया गाड्याही एनसीबीच्या हाती लागल्या आहेत. जे ड्रग्स जप्त केले आहेत ते साखरेच्या पिशव्यांमध्ये ठेवण्यात आले होते. चिंकू पठाण कुख्यात गुंड करीम लाला याचा नातेवाईक असून दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here