समीर वानखेडेंची बदली, महसूल गुप्तचर संचालनालयात पुन्हा नियुक्ती

एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांचा प्रमुख पदावरील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली महसूल गुप्तचर संचालनालय करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला होता. मात्र पदमुक्ततेची सूचना त्यांनी देण्यात आली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी समीर वानखेडे यांची बदली डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालय येथे बदली करण्यात आली आहे. या बदलीपूर्वी वानखेडे एनसीबीमध्ये येण्यापूर्वी महसूल गुप्तचर संचालनालय येथे कार्यरत होते.

समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना या विभागातच मुदतवाढ मिळावी, यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला होता. समीर वानखेडेंना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत समीर वानखेडेंवर चांगलाच निशाणा साधला होता. तसेच मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्याने चर्चेत होते. या प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विविध आरोप केले. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याकडून तपास करत असलेल्या पाच प्रकरणाचा तपासही काढून घेण्यात आला होता.

या पदांवर वानखेडे होते कार्यरत

  • 2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट ( Air Intelligence Unit ) चे उपायुक्त,
  • राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ( National Investigation Agency )
  • अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे ( Directorate of Revenue Intelligence )
  • संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ( Narcotics Control Bureau ) विभागीय संचालक म्हणून होते कार्यरत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here