NCB ने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. तब्बल 50 किलो एमडी ड्रग्ज एनसीबीच्या अधिका-यांनी या कारवाई दरम्यान जप्त केले आहेत. फोर्टमधल्या कबुतरखाना परिसरातल्या गोडाऊनमध्ये हे ड्रग्ज सापडले आहेत.
50 किलो ड्रग्ज जप्त करत एनसीबीने दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत सुमारे 100 कोटी रुपये इतकी आहे. अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एक जण भारतातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करांपैकी एक असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे मुंबईचे रहिवासी असून हे एक मोठे नेटवर्क आहे ज्यात आणखी काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात याआधीही काही जणांना अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा: “धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार”; शंभुराज देसाईंचा दावा )
दरम्यान, गुजरातमध्येही एनसीबीने एमडी ड्रग्ज प्रकरणात कारवाई केली आहे. एकूण 60 किलो एमडी जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 120 कोटी इतकी आहे. गुजरातच्या जामनगर येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. एअर इंडियामध्ये पायलट असणा-या सोहल नावाच्या व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि जामनगर येथे करण्यात आलेली छापेमारी ही एकाच प्रकरणाशी संबंधित आहे. एका लॅबमध्ये हे ड्रग्ज बनवले जात होते. लॅब चालवणा-या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी याआधी अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community