National Herald Case: सोनिया गांधींची ३ तासानंतर ED चौकशी संपली

117

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीकडून चौकशी करण्यात आली. गुरूवारी १२ वाजता सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. साधारण तीन तास चौकशी चालली. मात्र सोमवारी पुन्हा सोनिया गांधींना चौकशीला बोलवण्यात येणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यावेळी सोनिया गांधींच्या घशाला त्रास होत असल्याने त्यांनी ईडीच्या प्रश्नाला लेखी उत्तरे दिल्याची माहिती मिळत आहे. तर गेल्या महिन्यात राहुल गांधी यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यावेळी त्यांची सलग तीन दिवस अनेक तास चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे आज सोनिया गांधींची किती तास चौकशी होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून होते.

(हेही वाचा – प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईकांची युवासेनेतून हकालपट्टी)

ईडीकडून सोनिया गांधींच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित होत्या. तुम्हाला जे विचारायचे आहे ते तुम्ही विचारू शकता मी ८ वाजेपर्यंत बसण्यास तयार आहे. तसेच मी उद्या देखील येण्यास तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या परंतु, इडीकडे कोणतेही प्रश्न नव्हते. कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या सोनिया गांधी या चौकशीला आज, गुरुवारी हजर राहिल्या. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्यांच्याबरोबर होते. प्रियंका गांधी यांना ईडीच्या मुख्यालयात थांबण्यास परवानगी दिली. कारण सोनिया गांधी यांना वेळेवर औषधे देता येतील. प्रियंका गांधी यांना सोनिया गांधी यांच्या खोलीपासून दूर ठेवण्यात आले होते. एकीकडे सोनिया गांधींच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे ईडीने सोनिया गांधींच्या चौकशीसाठी खास प्लान तयार केला आहे. सोनिया गांधींची ईडीकडून तीन टप्प्यांमध्ये चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा करणार आहेत.

 

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी केली जाईल. प्रश्नांच्या पहिल्या टप्प्यात, त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील ज्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये आयकर विभागात कर भरता का ? त्यांचा पॅन क्रमांक काय आहे? देशात त्यांची कुठे-कुठे मालमत्ता आहे ? परदेशात मालमत्ता कुठे आहे? त्यांची किती बँक खाती आहेत? कोणत्या बँकेत खाती आहात ? सोनिया गांधींना आलेल्या या समन्समुळे काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या समन्सविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. मुंबईतही आज काँग्रेस नेत्यांनी ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यासोबतच नाशिक आणि पुण्यातही काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.