महिलांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या ह.भ.प. बंडातात्या कराकडकर यांची वारकरी संप्रदायातून वारकऱ्यांनी हकालपट्टी करावी. कराडकर यांना पंढरीत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा सोलापूर आणि पंढरपूर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
कराडकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करा!
बंडातात्या यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा हा अपमान आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या अशा विकृतीला वारकरी संप्रदायामधून हाकलून द्यावे. कराडकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांना दिले आहे.
(हेही वाचा – पुण्यात किरीट सोमय्यांना धक्काबुक्की! शिवसैनिकांनी अडवली गाडी, नेमकं काय घडलं)
बंडातात्यांच्या तोंडाला काळे फासणार
बंडातात्या कराडकर यांना पांडुरंगाची नगरी असलेल्या पंढरपूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही. पांडुरंगाच्या मंदिराची पायरी चढू देणार नाही आणि तसा प्रयत्न जरी केला तर ही राष्ट्रवादीची युवती तुमच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community