धक्कादायक! राज्यातील २४ हजार महिला बेपत्ता

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत माहिती

74

नॅशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरोच्या अहवालानुसार २०२० अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे २४ हजार ५७९ महिला बेपत्ता आहेत. महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने कायदे कडक करण्यात येत आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आता तपास करणे चौकशी अधिका-यांवर करण्यात आले आहे अशी माहिती माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी (ता.२२) विधानसभेत लेखी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

एनसीआरबीच्या अहवालातून माहिती उघड 

राज्यात महिलांविरोधी गुन्हयांशी संबंधित खटले प्रलंबित असल्याच्या संदर्भात  प्रकाश फातर्पेकर, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नॅशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरोने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार राज्यातील ६३ हजार २५२ बेपत्ता महिलांपैकी ४० हजार ०९५ महिला सापडल्या तर २०२० अखेर पर्यंत राज्यातील ४ हजार ५१७ बेपत्ता अल्पवयीन मुलींपैकी ३ हजार ९५ अल्पवयीन मुली सापडल्याची माहिती यावेळी देण्यात आली. फिर्यादी फितुर होणे, साक्षीदार फितुर होणे, फिर्यादीकडून गुन्हा विलंबाने दाखल होणे यामुळे अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार निर्दोष मुक्त होतात असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

(हेही वाचा – ‘सरकारचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही’, फडणवीसांची टीका)

महाराष्ट्राचा चौथा क्रमांक

महिलांविरोधातील गुन्ह्यांत यूपीनंतर पश्चिम बंगाल (३६ हजार ४३९) आणि राजस्थान (३४ हजार ५३५) यांचा क्रमांक लागतो. तर या यादीत महाराष्ट्र (३१ हजार ९५४) चौथ्या स्थानावर आहे. आदल्या वर्षीच्या म्हणजेच २०१९ च्या तुलनेत राज्यातील महिलांविरोधी गुन्ह्यांचा आकडा ५ हजार १९० ने घटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.