भारतात दरवर्षी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. 2021 मध्ये भारतात तब्बल 1 लाख 64 हजार 33 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये ही संख्या 1 लाख 53 हजार 52 होती. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या वर्षी आत्महत्यांचे प्रमाण 6.2 टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जास्त म्हणजे 22 हजार 207 आत्महत्या झाल्या आहेत. NCRB ने नुकताच त्यांचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात दररोज 450 लोक वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करत आहेत.
National crime bureau च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि मध्य प्रदेश तिस-या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये देशभरात 1 लाख 64 हजार 33 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये 22 हजार 207 आत्महत्या या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.
( हेही वाचा: मेट्रोमुळे केवळ वातावरणातीलच नव्हे, तर राजकीय प्रदूषणही होणार कमी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले )
5 राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आत्महत्या
NCRB ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशभरातील एकूण आत्महत्यांपैकी 50.4 टक्के आत्महत्या या पाच राज्यांमध्ये झाल्या आहेत. उर्वरित 49.6 टक्के आत्महत्या या इतर 23 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्या आहेत. यूपीमध्ये देशातील आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ 3.6 टक्के आहे.
Join Our WhatsApp Community