एनसीआरबीच्या अहवालानुसार, चोरी, दरोडा, घरफोड्या यातील आरोपी काही हजार रुपयांपासून कोट्यावधी रुपयांवर डल्ला टाकतात. परंतु त्या तुलनेने आर्थिक फसवणूक, घोटाळे, हेराफेरी करुन व्हाईट काॅलर गुन्हेगार हे हजारो कोटींमध्ये लूटमार करतात. या व्हाईट काॅलर गुन्हेगारीत महाराष्ट्राने दिल्लीला मागे टाकत आघाडी घेतली आहे.
2021 च्या एनसीआरबीच्या अहवालानुसार, आर्थिक गुन्ह्यांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर आहे. मुंबई पाठोपाठ दिल्ली आणि हैदराबादमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत. एनसीआरबीने देशातील 19 महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावरील विविध समस्यांबाबत अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )
महाराष्ट्र चौथ्या स्थानावर
देशात आर्थिक गुन्हे संबंधित 1 लाख 74 हजार013 गुन्हे नोंद आहेत. यामध्ये राजस्थान (23,757), तेलंगणा ( 20,759), उत्तर प्रदेश ( 20,026) यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र (15, 550) चौथ्या स्थानावर आहे. मुंबई पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित गुन्ह्यांसाठी सुमारे 3 हजार 700 लोकांना अटक केली. यामध्ये 153 महिला आरोपींचा समावेश आहे. 2 हजार 534 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत 4 हजार 774 कोटींच्या फसवणुकीचा तपास सुरु आहे. गेल्या वर्षी 4 हजार 774 कोटी 9 लाख 51 हजार 969 गुन्ह्यांचा तपास केला.