सिंधुदुर्ग जिल्ह्यात NDRF टीम दाखल!

140

प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफच्या (NDRF) २२ जवानांची एक टीम दाखल झाली आहे.

22 जवानांची एनडीआरएफची टीम सज्ज

नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, सतर्क राहून स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. पुढील तीन दिवसात जिल्ह्यात रेड अलर्ट असल्यामुळे पूर्व सुरक्षितता म्हणून 22 जवानांची एनडीआरएफची एक टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी कच्ची घरे गोठ्यांची पडझड झाली असेल त्याचे पंचनामे तात्काळ करा असे निर्देश के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

( हेही वाचा : कोरोना काळात पॅरोलवर गेलेले ८७२ कैदी फरार, राज्यभर गुन्हे दाखल)

नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता वाटल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाच्या 02362-228847 तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. नागरिकांनी नदीपात्राजवळ अथवा पाणी आलेल्या ठिकाणी तसेच समुद्र किनाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी जाऊ नये. स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवणार नाही याबाबत काळजी घ्यावी. सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. नागरिकांनीही स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.