पूर जोखीम कमी करण्याची सर्वांची गरज- अजोय मेहता

पूर जोखीम व्यवस्थापन करताना सूक्ष्म स्तरीय व परिपूर्ण अभ्यास करणे आणि त्या अभ्यासावर आधारित आराखडा तयार करणे गरजेचे असल्याने यावर भर दिला. आराखडा तयार करताना येणाऱ्या संभाव्य समस्यांचा व आव्हानांचाही विचार करणे आवश्यक आहे. यानुसार तयार करण्यात आलेल्या आराखड्याची परिपूर्ण अंमलबजावणी केल्यास पूर जोखमीचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे अर्थात ‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध! )

एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने ‘मलबार हिल’ परिसरातील ‘सह्याद्री राज्य अतिथीगृह’ येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. मुंबईसारख्या महानगरात पूर जोखीम अनेकदा अनुभवायला येते. या पूर जोखमीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येऊन एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रयत्नांमध्ये सूक्ष्म स्तरीय व विविधांगी विचार करून आराखडा तयार करणे आणि त्या आराखड्याची परिणामकारक अंमलबजावणी वेळच्यावेळी करणे; यासारख्या बाबींचा प्राधान्याने समावेश असायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here